स्तुत्य उपक्रमाचे फोंडाघाट पंचक्रोशीत कौतुक
फाेंडाघाट (प्रतिनिधी) : स्वच्छ आणि ताज्या पाण्याच्या नैसर्गिक स्रोताचे जतन करून,त्याची काळजी घेताना, शाश्वत संरक्षणासाठी कार्यरत राहणे, हा जागतिक जलदिनाचा “शांततेसाठी पाणी” हा संदेश संयुक्त राष्ट्र संघाने ठरविला आहे. याच उद्देशाने फोंडाघाट गांगोवाडी येथील ज्येष्ठ ग्रामस्थ शिवाजी (भाई) सावंत आणि प्रकाश (बाळा) पटेल यांचे बंधू संतोष सावंत यांनी,स्वखर्चाने भव्य शेततळ्याची बांधणी केली आहे. नैसर्गिक झऱ्याचे जतन-संवर्धन आणि पाण्याची साठवणूक करताना, आज जागतिक जल-दिनाचे औचित्य साधून जलसाठवणीचे जलपूजन केले. यानिमित्ताने उपस्थितानी ब्राह्मण भोजनाचा लाभ घेतला. परिसरातील ग्रामस्थांना या शेततळ्यातील पाण्याचा भविष्यात उपयोग होणार आहे. या उपक्रमाबद्दल त्यांचे पंचक्रोशीत कौतुक होत आहे.












