कणकवली (प्रतिनिधी) : श्यामची आई पुस्तकात साने गुरुजी आणि त्यांच्या आईमधील एक संवाद आहे. एक फुलपाखरू मरते आणि श्याम म्हणतो की मेलेल्या फुलपाखराचे मी सुतक पाळणार. श्यामची आई म्हणते फुलपाखराचे कोणी सुतक पाळते का ? त्यावर श्याम म्हणतो आपल्या माणसांचे सुतक पाळतो ना आपण, तसेच मी फुलपाखराचेही सुतक पाळणार. या प्रसंगातून भूतदया म्हणजे काय हे नेमकं अधोरेखित होतं. साने गुरुजी यांच्या भूतदयेच्या शिकवणी ची आज जगाला गरज आहे.विशेषतः वाढत्या उन्हाळ्यामुळे किमान दाणा पाणी तरी पशुपक्ष्यांना माणूस नक्कीच देऊ शकतो. पिडबल्युडी चे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी साने गुरुजींची भूतदयेची हीच शिकवण कृतीतून अंमलात आणली आहे. वाढत्या उन्हाळ्यात पशु पक्षांसाठी आपल्या शासकीय निवासस्थान परिसरात त्यांनी चिमणी पाखरांसाठी दाणा पाण्याची सोय केली आहे. त्यामुळे उन्हा च्या झळानी त्रस्त झाले पक्षी पाणी पिऊन दाणे टिपून आपली तहानभूक भागवत आहेत. साने गुरुजींनी शिकवलेल्या मानवता धर्माची जपणूक एक प्रकारे सर्वगोड करत आहेत. सां बा विभाग कणकवली च्या राष्ट्रीय महामार्गालगतच्या विश्राम गृहा जवळ गटारात भटक्या कुत्री ने चार पिलांना जन्म दिला आहे. त्या कुत्रीसह पिल्लांना रोज खाऊ देत आहेत. आपण सर्वजण या पृथ्वीचे निसर्गाचे लेकरे आहोत आपण आपल्या कुटुंबाची जशी काळजी घेतो तशी निसर्गातील पशु पक्षी आणि प्राण्यांची सुध्दा काळजी घेणे आवश्यक आहे. हा साने गुरुजींचा संदेश सर्वगोड आपल्या कृतीतून जपत आहेत.













