बौध्दजन पंचायत समिती शाखा क्र.२८५ चिंचपोकळी, मुंबई च्या वतीने डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांना अभिवादन
खारेपाटण (प्रतिनिधी) : विश्वरत्न डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांनी महाड चवदार तळे येथे दि.२० मार्च रोजी केलेल्या पाण्याच्या सत्याग्रहाला ९७ वर्षे पूर्ण झाली असून या दिनाचे औचित्य साधून चिंचपोकळी, मुंबई येथील बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र. २८५ च्या वतीने नुकतेच महाड चवदार तळे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला मानवंदना देऊन अभिवादन करण्यात आले.
यावेळी बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र.२८५ चे अध्यक्ष रमेश कुडोपकर यांच्या नेतृत्वाखाली महाड येथील धम्म सहली बरोबरच कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर देखील घेण्यात आले. यामध्ये संस्थेचे उपाध्यक्ष- रमेश मानाजी कदम, सचिव- संजय धोंडू कदम (कामतेकर), खजिनदार- सुधीर दशरथ मोहिते, संदेशवाहक- संतोष रामचंद्र पवार, राजन सावळाराम जाधव, प्रमुख सल्लागार- सोमा मानाजी कदम, शीतल शिवराम कदम, यांसह श्रावस्ती सोसायटी चिंचपोकळी, मुंबई येथील रहिवासी धम्म बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बौध्दजन पंचायत समिती शाखा क्र.२८५ च्या वतीने श्रावस्ती गृह निर्माण सोसायाटीच्या प्रमुख कार्यकर्ते व रहिवासी यांनी खाजगी ट्रव्हलद्वारे महाड चवदार तळे येथील क्रांती भूमीला सदिच्छा भेट दिली. व चवदार तळे पाण्याच्या संघर्ष आणि सत्याग्रह लढ्याबाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केल्याची माहिती बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र.२८५ चे सेक्रेटरी संजय धोंडू कदम यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.















