समानवता ट्रस्ट सिंधुदुर्गचा उपक्रम
चौके (प्रतिनिधी) : समानवता ट्रस्ट सिंधुदुर्ग यांच्या वतीने मालवण तालुक्यातील काळसे येथे महिलांसाठी मोफत शिलाई मशिन प्रशिक्षण म्हणजेच टेलरींग कोर्स सुरू करण्यात आला आहे. या प्रशिक्षणाचा शुभारंभ काळसे माळकेवाडी येथील संगितकार कै. वसंतराव गोसावी सभागृह येथे शिवाजी विद्यामंदिर काळसेच्या माजी मुख्याध्यापिका शालिनी परुळेकर यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून करण्यात आला यावेळी समानवता ट्रस्ट चे सेक्रेटरी कमलेश गोसावी, शुभदा गोसावी, प्रशिक्षक रश्मी दाभोळकर, मधुकर साळसकर, मंगल साळसकर, समानवता ट्रस्ट सिंधुदुर्गचे प्रतिनिधी संजय गोसावी आदी मान्यवर उपस्थित होते.
समानवता ट्रस्ट च्या या उपक्रमास परिसरातील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत ३५ महिलांना उद्घाटन कार्यक्रमास हजेरी लावली आणि मोफत टेलरिंग प्रशिक्षणासाठी नोंदणी केली. समानवता ट्रस्ट सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारच्या बॅचेस घेत आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावांमध्ये 150 पेक्षा अधिक महिलांना मोफत टेलरिंग प्रशिक्षण देण्यात आलेले आहे.