लोकसभा उमेदवारीचा तिढा सुटणार ?
मुंबई (ब्युराे न्युज) : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी केंद्रीयमंत्री नारायण राणे हे सायंकाळी साडेपाच वाजता सागर बंगल्यावर दाखल झाले आहेत. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीत नारायण राणे यांचे नाव उमेदवार म्हणून आघाडीवर असून शिवसेनेकडून किरण सामंत यांनीही आपली दावेदारी कायम ठेवली आहे. तळकोकणात महायुती च्या उमेदवारीचा तिढा अद्याप सुटला नसला तरीही लोकसभा निवडणुकीत भाजपाचे स्टार प्रचारक असलेले नारायण राणे यांनाच उमेदवारी मिळणार अशा बातम्या आज सकाळपासून मीडियात येत आहेत. या पार्श्वभूमीवर स्वतः नारायण राणे फडणवीसांच्या भेटीला सागर बंगल्यावर पोचले असून रत्नागिरी सिंधुदुर्ग च्या उमेदवारी चा प्रश्न निकाली लागण्याची शक्यता आहे.












