मंत्री चव्हाण यांच्या उपस्थितीत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा कोअर समिती ची उद्या रत्नागिरीत महत्वाची बैठक

रत्नागिरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्गचे पालकंत्री व राज्याचे बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे मंगळवार बुधवार हे दोन दिवस रत्नागिरी सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत असून या दोन दिवसांच्या कार्यक्रमात रवींद्र चव्हाण रत्नागिरीसह सिंधुदुर्गच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. रवींद्र चव्हाण हे मंगळवारी रत्नागिरीत असून सकाळी ९ ते १२ या वेळेत हॉटेल व्यंकटेश डायनिंग येथे भाजपाचे रत्नागिरीतील नेते राजेश सावंत, बाळ माने, प्रमोद अधटराव व उल्का विश्वासराव यांच्याशी चर्चा करणार आहेत. त्यानतर दुपारी १२ वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात ते चिपळूण, रत्नागिरी व राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघातील विधानसभा वॉरिअर्स, शक्तीकेंद्र प्रमुख बुथप्रमुख व प्रमुख पदाधिकारी यांच्या समवेत बैठक समवेत घेणार आहेत. या बैठकी नंतर ते सावंतवाडीकडे रवाना होणार आहेत.

सिंधुदुर्ग जिल्हयातील दौऱ्यात रवींद्र चव्हाण रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा कोअर कमिटी समितीची बैठक घेणार आहेत यावेळी सिंधुदुर्ग मधील भाजपाचे नेते जिल्हाप्रमुख प्रभाकर सावंत, निलेश राणे, राजन तेली, नितेश राणे, प्रमोद जठार या नेत्यांशी चव्हाण चर्चा करणार आहेत व त्या नंतर महालक्ष्मी हॉल कुडाळ येथे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या पदाधिकाऱ्यां समवेत बैठक घेणार आहेत. या प्रमुख पदाधिकारी बैठकीत ते कार्यकर्त्यांना कोणते मार्गदर्शन करणार याकडे राजकीय समिक्षकांचे लक्ष लागले असून महायुतीच्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील उमेदवार जाहीर होणाच्या पार्श्वभूमिवर रवींद्र चव्हाण यांचा हा दौरा महत्वाचा मानला जात आहे.

error: Content is protected !!