पुढील वाढदिवशी अनंत पिळणकर जिल्हा परिषद सदस्य असतील – अमित सामंत

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली किंवा कुडाळ विधानसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीचा उमेदवार अनंत पिळणकर असतील असे शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर, राष्ट्रीय काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांच्या परवानगी ने जाहीर करतो. भले यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घ्यावी लागली तरी चालेल. निःस्वार्थी वृत्तीने जनहितासाठी झटणारा कार्यकर्ता म्हणजे अनंत पिळणकर आहे. आजच्या जमान्यात निःस्वार्थी वृत्तीने सत्तेला लाथाडून एकनिष्ठ राहणारे दुर्मिळ आहेत, अनंत पिळणकर त्यातील एक आहेत. पक्षसंघटनेसाठी संपूर्ण जिल्ह्याभरात फिरणारे पिळणकर आहेत. एक मित्र म्हणून मि कायम तुमच्यासोबत आहे. पुढील वाढदिवस हा जिल्हा परिषद सदस्य असलेल्या अनंत पिळणकर यांचा असेल अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी अनंत पिळणकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी मंत्री प्रवीण भोसले, शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर, शिवसेना सिंधुदुर्ग नेते अतुल रावराणे, राष्ट्रवादी काँग्रेस सावंतवाडी विधानसभा संघटक अर्चना घारे परब, उद्योजक दीपक कदम,मनसे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष राजू दिंडोर्ले, प्रा. दिवाकर मुरकर, माधवी दळवी, सावंतवाडी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, विष्णूभाई पिळणकर, शिवसेना कणकवली उपतालुकाप्रमुख राजू रावराणे,मनसे कोल्हापूर शहरप्रमुख प्रसाद पाटील आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!