जनतेचे प्रेम सामाजिक राजकीय जीवनात पाठबळ देतील – अनंत पिळणकर

कणकवली (प्रतिनिधी) : राजकीय प्रवासात माझे मित्र राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत, संदेश पारकर यांनी कायम ढालीसारखे पाठबळ दिले.आमच्या गावचे सुपुत्र उद्योजक दीपक कदम हे शस्स्त्रक्रिया होऊन प्रकृती ठीक नसतानाही मुद्दाम मुंबईहून आज वाढदिवसाला आले आहेत. आज कोल्हापूर, पुणे पासून माझ्यावर प्रेम करणारी आप्तेष्ट आज उपस्थित आहेत. समाजसेवा करताना तुम्हा सर्वांचे आशीर्वाद मला कायम पाठबळ देतील असे भावुक उदगार राष्ट्रवादी काँग्रेस कणकवली चे तालुकाध्यक्ष उत्सवमूर्ती अनंत पिळणकर यांनी काढले. मनोगत व्यक्त करताना अनंत पिळणकर यांचे डोळे नकळत पाणावले होते . राष्ट्रवादी काँग्रेस कणकवली तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांचा वाढदिवस नवीन कुर्ली वसाहत येथील निवासस्थानी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी माजी मंत्री प्रवीण भोसले,राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत, शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर, शिवसेना सिंधुदुर्ग नेते अतुल रावराणे, राष्ट्रवादी काँग्रेस सावंतवाडी विधानसभा संघटक अर्चना घारे परब, उद्योजक दीपक कदम,मनसे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष राजू दिंडोर्ले, प्रा. दिवाकर मुरकर, माधवी दळवी, सावंतवाडी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, विष्णूभाई पिळणकर, शिवसेना कणकवली उपतालुकाप्रमुख राजू रावराणे,मनसे कोल्हापूर शहरप्रमुख प्रसाद पाटील आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!