शरद पवार यांच्या विचारांचा निष्ठावन्त कार्यकर्ता म्हणजे अनंत पिळणकर – प्रवीण भोसले

कणकवली (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसच्या निष्ठावान पदाधिकाऱ्यांत अनंत पिळणकर यांचे नाव आहे. देशाचे संविधान वाचविणारा विचारप्रवाह पुढे नेण्याचे काम शरद पवार करत आहेत. आज पवार यांच्या विचारांसोबत सत्तेच्या विरोधात जाऊन पिळणकर निष्ठेने उभे आहेत.राज्यात जरी मनसे सोबत नसली तरी अनंत पिळणकर सोबत मात्र मनसेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष आहेत हे जमेची बाजू आहे. सगळ्या पक्षातील पदाधिकाऱ्यांना एका माळेत गुंफण्याचे काम पिळणकर यांनी केले आहे. पिळणकर यांचे राजकीय भविष्य उज्वल आहे अशा शब्दांत माजी मंत्री प्रवीण भोसले यांनी अनंत पिळणकर याना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी मंत्री प्रवीण भोसले,राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत, शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर, राष्ट्रीय काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, प्रकाश जैतापकर, शिवसेना सिंधुदुर्ग नेते अतुल रावराणे, राष्ट्रवादी काँग्रेस सावंतवाडी विधानसभा संघटक अर्चना घारे परब, उद्योजक दीपक कदम,मनसे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष राजू दिंडोर्ले, प्रा. दिवाकर मुरकर, माधवी दळवी, सावंतवाडी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, विष्णूभाई पिळणकर, शिवसेना कणकवली उपतालुकाप्रमुख राजू रावराणे,मनसे कोल्हापूर शहरप्रमुख प्रसाद पाटील आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!