कणकवली (प्रतिनिधी) : अक्कलकोट श्री स्वामी समर्थ प्रकटदिन सोहळा 10 एप्रिल रोजी भक्तीभावात विठोबा रुक्मिणी स्वामी समर्थ स्वयंभू अनुष्ठान सेवा मठ नांदगाव मध्ये साजरा केला जाणार आहे. नांदगाव मधील स्वामी समर्थ स्वयंभू अनुष्ठान सेवा मठ हा एकमेव स्वयंभू अनुष्ठान सेवा मठ आहे. नांदगाव मधलीवाडी येथील निसर्गरम्य वातावरणात टेकडीवरील स्वयंभू स्वामी समर्थ मठ भक्तांना अनोखी मनःशांती देणारा स्वामी समर्थ मठ म्हणून भाविकांमध्ये प्रसिद्ध आहे.अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज प्रकटदिन 10 एप्रिल रोजी असून यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 8 : 30 ते 9 : 00 स्वामींचा अभिषेक, सकाळी 9 :30 ते 12 : 00 स्वामी मंत्र जप, दुपारी 12 : 00 ते 2 : 00 महाप्रसाद, सायंकाळी 5 : 30 ते 6 : 00 आरती असा कार्यक्रम असणार आहे. भाविकांनी उपस्थित राहून लाभ घेण्याचे आवाहन स्वामी भक्त सुरेश वारीक, ऍड. नरेंद्र साठे, आशिष उळमन, लक्ष्मीकांत देसाई यांनी केले आहे.













