ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील घोणसरी गावात बिबट्याचे मानवी वस्तीलगत दर्शन झाले असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अलीकडे मानवी वस्तीत श्वापद जनावरे येण्याच्या घटनेत वाढ झाली आहे. पिंपळवाडी तील मिलिंद मराठे याना बिबट्या मानवी वस्तीलगत दिसला. त्यानंतर त्यांनी आमदार नितेश राणेंकडे याबाबत उपाययोजना करण्याची विनंती केली. त्यानंतर आमदार नितेश राणे यांनी वनविभाग अधिकाऱ्यांना ह्याबाबत सूचना केली.
वनपाल -श्री धुळू रामा कोळेकर, वनरक्षक -श्री. अतुल पाटील, श्रीम.स्वाती सावंत, वनसेवक- श्री बबन बागवे, सुधाकर सावंत, प्रकाश राणे यांनी गावात जाऊन पाहणी केली .वनविभाग पथकाने ग्रामस्थांना घ्यावयाच्या खबरदारीबाबत माहिती देत जनजागृती केली आहे.












