आमदार नितेश राणे यांची खोचक टीका
सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : उबाठा चा दीड शहाणा भांडुप मध्ये बसून शहाणपणा शिकवत होता. उबाठा चा पेंग्विन आणि उद्धव आणि हा राऊत म्हणजे दीडशहाणे आहेत अशी टीका भाजपा प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी ठाकरे पिता पुत्र आणि संजय राऊत या त्रिकूटावर पत्रकार परिषदेत केली. विश्वगुरु म्हणून यशस्वी पंतप्रधान असलेल्या नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत होता. म्हणे मोदींना उद्धव ठाकरेंची भीती वाटते ? उद्धव ठाकरे ना स्वतःच्या मानेवर चा मच्छर सुदधा मारण्याची भीती वाटते.साधी एनसी सुद्धा उद्धव वर दाखल नाही. मोदींना जगातले दहशतवादी घाबरतात, पाकिस्तान, चीन सारखे देश घाबरतात. आज भारताकडे वाकड्या नजरेने बघायची कोणाची हिम्मत नाही कारण देशाचे पंतप्रधान मोदी आहेत. राऊत म्हणे ही उद्धव अर्जुन आणि श्रीकृष्ण असल्याची उपमा देतोय. हा राऊत उबाठा संपवत चालला आहे.राऊत चे पूर्ण कुटुंब खिचडीचोरी च्या गुन्ह्यात बरबटलेले आहे तो राऊत भाजपा नेतृत्वाला खंडणीखोर म्हणतो. हा मोठा विनोद आहे. उबाठा सोडून जाणारा प्रत्येक नेता संजय राऊत ला शिव्या घालून बाहेर का पडतोय ह्याचा विचार होणे गरजेचे आहे.संजय निरुपम यांनी खिचडीचोरी चा सूत्रधार संजय राऊत असल्याचे सांगत राऊत खिचडीचोर असल्यावर शिक्कामोर्तब केले आहे. राज ठाकरे जी भूमिका घेतली ती हिंदुत्वाच्या हिताची असणार आहे.लोकसभा निवडणुकीनंतर स्वतःची खासदारकी वाचवण्यासाठी संजय राऊत शिंदे शिबसेनेत गेलेला असेल अशी टीकाही आमदार नितेश राणे यांनी केली.












