कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ सिंधुदुर्ग च्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त विनम्रअभिवादन करण्यात आले .जिल्हा सचिव चंद्रसेन पाताडे, कणकवली तालुकाध्यक्ष महानंदा चव्हाण यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष सुजित जाधव, तालुकाध्यक्ष महानंदा चव्हाण, जिल्हा सचिव चंद्रसेन पाताडे, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र चव्हाण, जिल्हा संघटक लंवेद्र किंजवडेकर, तालुका उपाध्यक्ष शंकर चव्हाण, तालुका उपाध्यक्ष सत्यविजय जाधव, तालुका मार्गदर्शक केशव पावसकर, डॉ. अशोक नारकर, गणेश शिरकर ,प्रभाकर चव्हाण आदी उपस्थित होते.













