चार संचालक व सात एजंटांवर गुन्हा दाखल
मुख्य एजंट देवगड येथील
कारवाईने देवगडमध्ये खळबळ
देवगड येथील डॉ.आपटे यांच्या गाळ्यात थाटले होते ऑफीस
देवगड (प्रतिनिधी) : देवगडमध्ये इस्टोअर कंपनीच्या चार संचालकांसह सात एजंटांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून या कारवाईने देवगडमध्ये खळबळ उडाली आहे.ईस्टोअर कंपनीमध्ये गुंतवणुकदारांना भरघोस परताव्यातुन फायदा असल्याचा तसेच चांगल्या परताव्याचे आमिष दाखवुन वेगवेगळ्या स्कीमद्वारे रक्कम रोख स्वरूपात तसेच बँकींगद्वारे गुंतवणुकदारांकडून घेवून गुंतवणुकदार लोकांची सुमारे २६ लाख १४ हजार २१० रूपये रकमेची आर्थिक फसवणुक करून अपहार केल्याप्रकरणी देवगड पोलिसांनी ही कारवाई केली आहे.ही घटना दि. १७ ऑक्टोबर २०२० ते दि. ३० जुन २०२२ या कालावधीत घडली.या घटनेने देवगड तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली येथील \ैजान खान, शमशाद अहमद, गुरू द अली खान आणि मुकेश तेली यांनी ई-स्टोअर मधील वेदिक आयुरकेअर प्रा.लि.नावाची कंपनी स्थापन करून या कंपनीचे सिधुदूर्ग जिल्ह्यात मुख्य एजंट म्हणून देवीदास बाळकृष्ण खवळे रा.देवगड तारामुंबरी,अनिल काशीराम जाधव(मुंबई), संजना परांजपे(पनवेल), शैलेंद्र बाबुराव पेडणेकर(सावंतवाडी), रौनक पटेल(कणकवली), सचिन सावंत(कुडाळ), किरण कदम(कुडाळ नारूर) या एजंटद्वारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध भागात तसेच देवगड येथील बँक ऑफ इंडिया देवगड शाखेच्या वरील डॉ.आपटे यांच्या गाळ्यामध्ये मुख्य एजंट देवीदास परब यांनी ई स्टोअर मधील वेदिका आयुर केअर नावाचे कंपनीचे कार्यालय उघडून गुंतवणुकदार लोकांना ई स्टोअर मधील वेदिका कंपनीची ग्रोसरी, हेल्थ फॅमिली पॅकेज, वेदा पॉईट, वेदा माल्ट, मल्टीपल फॅमिली पॅकेज या नावाच्या पॅकेजवर भरघोस परतावा व फायदा असल्याचे तसेच चांगल्या परताव्याचे आमिष दाखवुन त्याकरीता वेगवेगळ्या स्कीमद्वारे रक्कम रोख तसेच बॅकींगद्वारे गुंतवणुकदारांकडून स्विकारून एकूण ५४ गुंतवणुकदारांना कंपनीचा आयडी नंबर देवून त्यांनी दिलेल्या स्कीममधील आश्वासने प्रमाणे परतावा रक्कमा मुदत संपुन सुध्दा परत न करता त्या रक्कमा स्वत:चा उद्योग धंद्यासाठी वापरून गुंतवणुकदार लोकांचा एकुण २६ लाख १४ हजार २१० रूपये रकमेचा आर्थिक अपहार केलेला आहे.तसेच ईस्टोअरमधील वेदीक आयुरकेअरचे मुख्य संचालक व एजंट यांनी देवगड परिसरातील तसेच जिल्ह्यातील विविध तालुक्यातील गुंतवणुकदार लोकांची अशाचप्रकारे मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणुक करून रकमेचा अपहार केला आहे अशी तक्रार तारामुंबरी येथील चैतन्या चेतन तारकर(३१) यांनी दिली असून या तक्रारीवरून देवगड पोलिसांनी या कंपनीचे मुख्य संचालक \ैजान खान, शमशाद अहमद, गुरू द अली खान आणि मुकेश तेली रा.दिल्ली व मुख्य एजंट अनिल काशीराम जाधव, संजना परांजपे, शैलेंद्र बाबुराव पेडणेकर, रौनक पटेल, सचिन सावंत, किरण कदम, देवीदास बाळकृष्ण खवळे यांच्याविरूध्द ४२०, ४०६, ४६५,४६७, ४६८, ४७१, ३४ प्रमाणे तसेच महाराष्टड्ढ ठेवीदारांच्या(वित्तीय संस्थांमधील हितसंबंधाचे संरक्षण)अधिनियम १९९९-३ याप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.तपास पोलिस निरिक्षक अरूण देवकर करीत आहेत.











