खारेपाटण टाकेवाडी येथील क्रिकेट स्पर्धेत शेर्पे इलेव्हन विजेता तर खारेपाटण रामेश्वर नगर संघ उपविजेता

खारेपाटण (प्रतिनिधी) : श्री कुंभार देव ग्रामस्थ मंडळ टाकेवाडी,खारेपाटण व जय बजरंगबली मित्र मंडळ टाकेवाडी,खारेपाटण यांच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच भरविण्यात आलेल्या गाव मर्यादित टेनिस बॉल ओहरआर्म क्रिकेट स्पर्धेत शेर्पे इलेव्हन हा संघ अंतिम विजेता ठरला असून रामेश्वर नगर खारेपाटण हा संघ उपविजेता ठरला आहे.ही संपूर्ण क्रिकेट स्पर्धा सामाजिक कार्यकर्ते व युवा उद्योजक रुपेश सावंत यांच्या सौजन्याने भरविण्यात आली होती. खारेपाटण टाकेवाडी येथील श्री देव कुंभार मंदिर येथील देवाच्या वार्षिकस्तोव कार्यक्रम निम्मित भरविण्यात आलेल्या या क्रिकेट स्पर्धेत एकूण १६ संघांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेता शेर्पे इलेव्हन या संघाला सामाजिक कार्यकर्ते व युवा उद्योजक रूपेश सावंत यांच्या शुभहस्ते प्रथम क्रमांकाचे रोख बक्षीस रोख रुपये १०,००० /- व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. तर उपविजेता संघ रामेश्वर नगर खारेपाटण या संघाला कुंभार देव ग्रामस्थ मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या शुभहस्ते द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक रोख रुपये ७,०००/- रुपये व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. तर या क्रिकेट स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज ,गोलंदाज व सामनावीर याना आकर्षक चषक देऊन जय बजरंगबली मित्र मंडळाच्या वतीनं गौरविण्यात आले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कुंभार देव ग्रामस्थ मंडळ टाकेवाडी, खारेपाटण व जय बजरंगबली मित्र मंडळ टाकेवाडी खारेपाटणच्या सर्वच कार्यकर्त्यांनी खूप परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!