खारेपाटण,टाकेवाडी येथील श्री कुंभरदेवाचा वार्षिक पूजा उस्तव संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण, टाकेवाडी येथील श्री देव कुंभार देव ग्रामस्थ मंडळाच्या वतीने येथील कुंभारदेव मंदिरात देवाचा वार्षिक पूजा उस्तव कार्यक्रम बुधवार दी.१७ एप्रिल २०२४ रोजी उस्ताही वातावरणात संपन्न झाला. यानिमित्त श्री कुंभार देव मंदिरात विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन मंडळाच्या वतीने करण्यात आले होते.यावेळी सत्यनारायणाच्या पूजेचे आयोजन देखील करण्यात आले होते. या अनुशंगाने तीर्थप्रसाद व महाप्रसाद याचे देखील आयोजन स्थानिक मंडळाच्या वतीने करण्यात आले होते.याचा खारेपाटण मधील भाविकांनी लाभ घेतला. खारेपाटण येथील सामाजिक कार्यकर्ते रुपेश सावंत यांच्या सौजन्याने यावेळी गाव मर्यादित क्रिकेट स्पर्धेचे आयोजन देखील करण्यात आले होते.तर देवाच्या वार्षिक उत्सव निमित्त श्री देव कुंभार मंदिराची आकर्षक अशी सजावट व मंदिराला विद्युत रोषणाई करण्यात आली होती. या उस्तवाला खारेपाटण माजी सरपंच रमाकांत राऊत, वीरेंद्र चिके उपसरपंच महेंद्र गुरव यांनी सदिच्छा भेट दिली.कुंभार देवाचे दर्शन घेतले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कुंभार देव ग्रामस्थ मंडळ टाकेवाडी खारेपाटण व जय बजरंगबली मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

error: Content is protected !!