आमदार नितेश राणे यांच्या वैभववाडी तालुक्यातील चालू असलेल्या विकास कामांचा धडाका बघून पक्षप्रवेश
वैभववाडी (प्रतिनिधी) : उबाठा चे युवासेना उपजिल्हाप्रमुख अतुल सरवटे यांच्यासह वेंगसर गावातील दिनेश गुरव, राहुल घाडी,प्रसाद गुरव, प्रशात घाडी,सिध्देश घाडी,शुभम शिंदे, संजय शिंदे, स्वप्निल दबडे,रुतिक घाडी, विजय घाडी, सुनिल पावसकर, गजानन पावसकर, रवींद्र पावसकर, विकास पावसकर, वसंत पावसकर, बाळकृष्ण पावसकर, सुभाष पावसकर, प्रशात पावसकर,शरद अनंत पावसकर यांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली काम करायचे ठरवलं असून त्यामुळे वैभववाडी तालुक्यातील वेंगसर गावातील ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जातो आहे.
यावेळी शक्तीकेंद्र प्रमुख रामदास पावसकर, दिलीप बेळेकर, सरपंच सुगंधा मंचेकर समाधान गुरव, महेश रांबाडे,भाजप पदाधिकारी उपस्थित होते.












