ऐनारी गुरववाडी येथील उबाठा युवासेनेचे उप विभाग प्रमुख रुपेश कांतीलाल गुरव यांच्या सह कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील ऐनारी गुरववाडी येथील उभाठा गटाचे कार्यकर्ते रुपेश गुरव, विशाल गुरव, अविनाश लोखंडे, नंदकिशोर गुरव, अमित गुरव, प्रसाद गुरव, ज्ञानेश्वर सकपाळ,हर्षल सुतार यांच्यासह असंख्य कार्यकर्ते भारतीय जनता पार्टी मध्ये पक्ष प्रवेश केला. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाकडून कोणते विकास कामे होत नसल्याने आमदार नितेश राणे यांच्या कार्याकडे पाहून भाजपमध्ये प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून ऐनारी गावामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली गावचा विकास आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून होऊ शकतो असा विश्वास त्यांना असल्यामुळे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे सांगितले.आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वावर प्रभावित होऊन रुपेश गुरव व कार्यकर्त्यांनी हा प्रवेश केला.

यावेळी नासिर काझी, दिलीप रावराणे, भालचंद्र साठे, राजेंद्र राणे, देवानंद पालांडे,आदि भाजप कार्यकर्ते उपस्थित होते..

error: Content is protected !!