कुडाळ (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी महायुतीचे लोकसभा उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी संघटने सहित आपण स्वतः प्रचाराचा झंझावात चालू केला आहे आज देवगङ ,मालवण,तालुक्यासह कुडाळ तालुक्यातील कुपवडे पंचक्रोशीतील जनतेशी संवाद साधला कुपवडे येथील राष्ट्रवादी पदाधिकारी बंटी परब यानी या बैठकीचे आयोजन केले होते या बैठकीत लोकांच्या व कार्यकर्ते यांच्या अडचणी समजून घेण्यात आल्या व या निवडणुकीत महायुतीचे लोकसभा उमेदवार आदरणीय नारायण राणे साहेब प्रचंड मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास देण्यात आला त्यावेळी बंटी परब, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सावंत,विलास गावकर, निशिकांत कडुलकर, गणेश चौगुले आदी उपस्थित होते.
राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांचा महायुतीचे लोकसभा उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी कूपवडे पंचक्रोशीत झंझावात












