श्रीमंत शाहू महाराज उभे राहिल्यानं भाजपची पायाखालची वाळू निसटली

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ४ जूनला कोल्हापूरचा निकाल ऐकूनच मुंबईला जावे

आमदार पी एन पाटील यांनी लगावला टोला

कोल्हापूर (प्रतिनिधी) : लोकसभेच्या निवडणुकीत श्रीमंत शाहू महाराज उभे राहिल्यानं भाजपची पायाखालची वाळू निसटली. त्यामुळंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कोल्हापूरात तळ ठोकण्याची वेळ आली. त्यामुळं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ४ जूनला कोल्हापूरचा ऐतिहासिक निकाल ऐकूनच मुंबईला जावा ’, असा टोला आमदार पी एन पाटील यांनी लगावला. श्रीमंत शाहू महाराज यांच्या प्रचारार्थ पन्हाळा तालुक्यातील पडळ इथं जाहीर सभेत ते बोलत होते.

श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी, शेतकरी केंद्र बिंदू मानून शेतकऱ्याच्या प्रश्नांवर आवाज उठविणार असल्याची ग्वाही दिली. समतेचे विचार दिल्लीत पोहचविण्याबरोबरच सर्व सामान्यांचा सर्वांगीण विकास हेच माझे ध्येय असणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!