कणकवलीत बसवेश्वर महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा उत्साहात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम, शासकीय कार्यालयांमध्ये बसवेश्वर महाराज यांची जयंती साजरी
कणकवली (अनिकेत उचले) : आवणीवरती अर्धमफार वाढल्यावरी सांगे ईश्वर धर्मरक्षणा जावे सत्वर जो बाळा जो, धर्मरक्षणा जावे सत्वर जो बाळा जो, बाराव्या शतकी अवतार झाला शेवधर्मला मिळे उजाळा, एैसा महात्मा जन्मासी आला जो बाळा जो बाळा अशी अंगाई गिते महिलांनी गात प. पू. भालचंद्र महाराज संस्थानातील भक्त निवास येथे अक्षय तृतीयेच्या महूर्तावर श्री बसवेश्वर महाराज यांची जयंती भक्तीमय वातावरणात, विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. हा जन्मोत्सव सोहळा लिंगायत समाजबांधवांनी याची देही याची डोळा पहिला.
सकाळच्या सत्रात ११ वा. श्री गणेश पूजा, श्री बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन डॉ.कणसे या ताम्पत्याच्या हस्ते करण्यात आले. दुपारी १२ वा. श्री बसवेश्वर महाराज जन्म सोहळा पार पडला.तद्नंतर आरती,तीर्थ प्रसाद तर सायंकाळच्या सत्रात महिलांसाठी फनीगेम्स, रेकाॅर्ड डान्स स्पर्धां पार पडल्या. यात स्पर्धांमध्ये महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत रंगत आणली. रात्री महाप्रसादाचा भाविकांनी लाभ घेतला.
अक्षय तृतीयेच्या महूर्तावर लिंगायत समाजाचे आराध्य दैवत श्री बसवेश्वर महाराज यांची जयंती साजरी केली जाते. शुक्रवारी प. पू. भालचंद्र महाराज संस्थानातील भक्त निवास येथे श्री बसवेश्वर महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी समाजाचे विश्वस्त, कणकवली तालुक्यातील लिंगायत समाज बांधव तसेच भाविक मोठ्या संख्येने उपस्थितीत होते. महिलांकडून श्री बसवेश्वर यांच्या बालमूर्तीस पाळण्यात घालून पाळणा म्हणत जन्म सोहळा साजरा केला. त्यानंतर आरती, दर्शन, तीर्थप्रसाद देण्यात आला. श्री बसवेश्वर महाराज लिंगायत समाजाच्या हितासाठी व सर्व धर्मियांसाठी केलेल्या कार्याची माहिती ज्येष्ठ समाजबांधवांनी दिली. जयंतीनिमित्त समाजबांधवांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले होते. तालुक्यातील शासकीय कार्यालयांमध्ये श्री बसवेश्वर महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. विविध क्षेत्रातील मंडळींनी या जयंती सोहळ्यास उपस्थित दर्शवूनराज श्री बसवेश्वर महायांचे दर्शन घेतले.
















