11 मे हा दिवस कुणकेश्वरला देवगड हापूस दिवस म्हणून साजरा केला जातो
देवगड (प्रतिनिधी) : देवगड म्हटलं की चटकन डोळ्यासमोर येतो तो देवगडचा हापूस आंबा आणि तोंडाला पाणी सुटतं अशी देवगड हापूसची ख्याती जगभरात पसरली आहे. देवगड तालुक्यातील कुणकेश्वर गावच्या इतिहासात 11 मे हा दिवस कुणकेश्वरला देवगड हापूस दिवस म्हणून साजरा केला जातो याचा कारणही तसेच आहे.
कुणकेश्वर येथील आंबा बागायतदार व देवस्थान ट्रस्ट यांच्या संकल्पनेतून श्री देव कुणकेश्वर मंदिरात आंब्याची रास करण्याचा संकल्प करण्यात आला. आज बघता बघता त्याला दहा वर्षे झाली. दरवर्षी ११ मे या कालावधीत देवगड हापूस आंब्याची आरास न चुकता केली जाते देवगड तालुक्यातील व कुणकेश्वर पंचक्रोशीतील आंबा बागायतदार न चुकता कुणकेश्वर चरणी हापूस आंब्याच्या पेट्या आरास करण्यासाठी देत असतात यातूनच ही आरास केली जाते यावर्षी ऋतुचक्र सातत्याने होणारे बदल त्यात आंबा पिकावर आलेले मोठे थ्रिप्सचे संकट अशातूनही मार्ग काढत आंबा बागायतदार यांनी आंबा पिकाचे उत्पन्न चांगले घेत आंबा पीक टिकवण्याचाही प्रयत्न केला सुरुवातीला हापूस आंब्याची आरास कमी प्रमाणात करण्यात येत होते मात्र जसजशी त्याची महती वाढली त्यानुसार आंबा बागायतदार यांची हापूस आंबा पेटी देणाऱ्यांची संख्या देखील वाढत चालली आहे. त्यामुळे मोठ्या पद्धतीने 11 मे या दिवशी देवगड हापूस आंब्याची आरास श्री देव कुणकेश्वर मंदिरात केली जात आहे श्री देव कुणकेश्वर मंदिरात केलेल्या हापूस आंब्याच्या आरासामुळे कुणकेश्वर मंदिर परिसर हा हापूस आंब्याच्या सुगंधाने दरवळून गेला आहे. कुणकेश्वर मंदिरातील गाभारा, सभामंडप आणि बाहेरील सभा मंडप या ठिकाणीही आरास करण्यात आली आहे. अनेक भक्तगण कुणकेश्वरला देवगड हापूस आंब्याची आरास पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात दाखल होतात त्यांचे फोटो सेशन करणे पसंत करतात कुणकेश्वर मंदिरात केलेल्या या आरासामधील हापूस आंबे प्रसाद म्हणून आलेल्या भाविकांना दुसऱ्या दिवशी वितरित केले जातात.
गेली दहा वर्ष कुणकेश्वर पंचक्रोशीतील आंबा बागायतदार देवगड हापूसच्या पेट्या या आरासा साठी देत आहेत आणि त्यातीलच काही भक्त गन मंडळी आपल्या कलेचा नमुना सादर करीत अप्रतिम अशी सुंदर कुणकेश्वर चरणी हापूस आंब्याची आरास करत आहेत यावर्षी हजारो आंब्यांची आरास श्री देव कुणकेश्वर चरणी करण्यात आली.




















