निराधार जख्मी बांधवांवर प्रथमोपचार सेवा करताना आत्मिक समाधान आणि आनंद मिळतो – जीवन आनंद संस्थाध्यक्ष संदिप परब

पायाच्या जखमेत पडलेल्या जंतूंमुळे विव्हळणारा नालासोपा-यातील निराधार बांधव समर्थ आश्रमात दाखल

खारेपाटण (प्रतिनिधी) : ” जखमांनी विव्हळणा-या रस्त्याकडच्या निराधार बांधवांवर प्रथमोपचार करताना आत्मिक समाधान आणि जीवन आनंद मिळतो.असे प्रतिपादन जीवन आनंद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री संदिप परब यांनी व्यक्त केले.

नालासोपारा पुर्व येथे तुळींज पोलीस स्टेशनच्या हद्दीत रुग्ण – विशाल भट (वय:४४) हा बांधव गेले कित्येक दिवस रस्त्याकडेला पायातील जख्मेने विव्हळत निराधार आणि सर्व दृष्टीने वंचित अवस्थेत जीवन कंठित होता. नालासोपारा येथे गुगल द्वारे संदिप परब यांच्या जीवन आनंद संस्थेची माहिती घेवून त्यांना जख्मांनी विव्हळणा-या बांधवाची माहिती दिली. त्यानंतर परब उज्वला यांनी कुडाळ जि.सिंधुदुर्ग येथून नालासोपा-यात धाव घेत सदर बांधवाची सुटका केली.

यावेळी सहकारी – भाईदास माळी, गोविंद मार्गि, संपदा सुर्वे यांचेसह संस्थेचे हितचिंतक बबलु यादव यावेळी उपस्थीत होते. यावेळी नालासोपारा तुळींज पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व स्थानिक कार्यकर्त्यांचे विशेष सहाय्य लाभले. जीवन आनंद संस्था गेली ११ वर्षांहून अधिक काळ महाराष्ट्र राज्यातील मुंबई, पालघर, सिंधुदुर्ग जिल्ह्यासह गोव्यातील आश्रम आणि शेल्टर होमद्वारे रस्त्यावरील निराधार बांधवांसाठी कार्यरत आहे.

कोणाही व्यक्तीला विनाकारण रस्त्यावर निराधार व वंचित जीवन जगावे लागू नये. निराधार वंचिताना माणूस म्हणून सन्मानाचे जीवन जगता यावे. ज्यांचे या जगात कोणी नाही. त्यांचेसाठी जीवन आनंद संस्था आहे.असे ब्रीद घेवून संस्थेचे कार्यकर्ते कार्यरत आहे.

error: Content is protected !!