कला वाणिज्य व विज्ञान या तिनही शाखांचा निकाल १००% संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांनी केले यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन
वैभववाडी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या वतीने फेब्रुवारी – मार्च २०२४ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र ( इ.१२ वी) बोर्ड परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. वैभववाडी तालुक्यातील कै.हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालयातील कला शाखेतून ५७ विद्यार्थी, वाणिज्य शाखेतून १०२ व विज्ञान शाखेतून १०० विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. कला,वाणिज्य व विज्ञान या तीनही शाखेतून एकूण २५९ विद्यार्थी एच.एस.सी. परीक्षेस प्रविष्ठ झाले होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होत महाविद्यालयाच्या तीनही शाखांचा निकाल १०० टक्के लागला आहे.
कला शाखेतून कु. यश बाबू शेळके या विद्यार्थ्याने ७७.% टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला तर कु.प्रिती विजय सावंत हिने ने ७६% गुण मिळवत द्वितीय क्रमांक पटकावला व कु.रिया रविंद्र मोरे हिने ७४.०० % गुण प्राप्त करत कला शाखेतून तृतीय क्रमांक प्राप्त केला.
वाणिज्य शाखेतून कु.मोरे प्रफुल्ल प्रविण या विद्यार्थ्याने ८५.६७% टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला तर कु.परब शुभम दिलिप याने ८४.५० % गुण मिळवत द्वितीय क्रमांक पटकावला व कु.करवंजे वैष्णवी अनंत हिने ८३.६७ % गुण प्राप्त करत वाणिज्य शाखेतून तृतीय क्रमांक प्राप्त केला.
विज्ञान शाखेतून कु.सुतार हर्ष सुरेश या विद्यार्थीनीने ८२.८३% टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला तर कु.खाडे हर्ष श्रीकांत याने ८२.५० % गुण मिळवत द्वितीय क्रमांक पटकावला व कु.चाळके अक्षता सहदेव हिने ८१.००% गुण प्राप्त करत विज्ञान शाखेतून तृतीय क्रमांक प्राप्त केला.
प्रशालेतील विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या उज्ज्वल यशाबद्दल व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या विद्यालयातील शिक्षकांचे प्रशालेचे स्थानिक अध्यक्ष तथा वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे, संचालक शरद नारकर, विजय रावराणे, मुख्याध्यापक बी.एस.नादकर, उच्च माध्यमिक विभाग प्रमुख पी.जे.सावंत, यांनी अभिनंदन केले व विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.












