कला विभागाचा 97.67 तर वाणिज्य विभागाचा 98.91टक्के निकाल
आचरा (विवेक परब) : धी आचरा पीपल्स असोसिएशन संचलित न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आचराचा बारावीच्या निकालात आपल्या उज्वल यशाची परंपरा कायम राखत. कला विभागात प्रविष्ट 43 विद्यार्थ्यांन पैकी 42 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन 97.67 टक्के निकाल लागला. तर वाणिज्य विभागात प्रविष्ट 92 पैकी 91 विद्यार्थी पास होउन प्रशालेचा निकाल 98.91टक्के लागला. कला विभागात मिस्बा तैयब काझी 89.83 टक्के गुण मिळवून प्रशालेत प्रथम येण्याचा मान मिळविला. तर द्वितीय कुमारी सानिया दत्तात्रय मळगी हिने 88.50टक्के गुण मिळविले. तर कुमार विशाल परशुराम धुरी यांनी 80.17 टक्के गुण मिळवून प्रशालेत तृतीय क्रमांक प्राप्त केला. वाणिज्य विभागात कुमारी संजना शरद पवार 88.17 टक्के गुण मिळवून प्रशालेत प्रथम आली. द्वितीय निर्झरा संदेश मालंडकर 87.33टक्के गुण मिळविले. तर अल्फीजा साजिद मुजावर 85.83 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला. यशस्वी विद्यार्थ्यांचे धी आचरा पीपल्स असोसिएशन चे अध्यक्ष डॉ प्रदिप मिराशी, कार्याध्यक्ष प्रदिप परब मिराशी, सचिव अशोक पाडावे तसेच सर्व समिती सदस्य, स्थानिक स्कूल कमेटीचे निलीमा सावंत, राजन पांगे, अर्जुन बापर्डेकर, बाबाजी भिसळे, रघुनाथ पाटील, मुख्याध्यापक गोपाळ परब, उपमुख्याध्यापक घुटूकडे यांसह सर्व शिक्षक पालक वर्गातून अभिनंदन करण्यात येत आहे.












