मसुरे (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील मुणगे येथील श्री भगवती हायस्कूल व स्व. वीणा सुरेश बांदेकर ज्यूनियर काॅलेजचा बारावीचा निकाल १००% लागला आहे. अकौंटिंग आणि ऑटोमोबाईल या दोन ट्रेड मधून २६ विध्यार्थी प्रविष्ठ झाले होते. प्रथम क्रमांक – विनेक संजय भोगले (८६.००%),द्वितीय क्रमांक – भागोजी राजेंद्र साळकर (८१.३३%), तृतीय क्रमांक – अमिषा अनिल रुपये (७५.६७%) यांनी यश प्राप्त केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था व प्रशालेच्या वतीने अभिनंदन होत आहे.















