कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे मार्फत घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या परीक्षेत ज्ञानदा शिक्षण संस्था संचलित आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे चा बारावीचा निकाल 100 टक्के लागला असून विज्ञान शाखेत विशेष श्रेणीत 16 विद्यार्थी, प्रथम श्रेणीत 42 विद्यार्थी, द्वितीय श्रेणीत 17 विद्यार्थी,उत्तीर्ण झाले असून एकूण 65 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. वाणिज्य शाखेत प्रथम श्रेणीतील आणि द्वितीय श्रेणीत दोन विद्यार्थीअसे एकूण पाच विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.
पहिले पाच उत्तीर्ण विद्यार्थी खालील प्रमाणे विज्ञान शाखा – शुभम सत्यवान तिवरेकर 89 %, आर्या निलेश मांजरेकर 87.37%, साईराज अंकुश तावडे 82.50%, सलोनी श्रीकृष्ण मुळीक 81.67 टक्के हर्षाली दिलीप साधये 80.50 टक्के, वाणिज्य शाखा- मंदिरा वैभव काणेकर ७१.83 टक्के, जिनात कय्युम शेख 70 टक्के, साहिल आरिफ शेख 69.83%.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे ज्ञानदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.विद्याधर तायशेटे, उपाध्यक्ष मोहन सावंत, कार्याध्यक्ष बुलंद पटेल, सचिव हरिभाऊ भिसे, सहसचिव निलेश महेंद्रकर, खजिनदार शितल चव्हाण, सल्लागार डी.पी तानवडे, प्राचार्या अर्चना देसाई तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक वर्गातून अभिनंदन केले जात आहे.










