कणकवली (प्रतिनिधी) : एस एम ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स कॉमर्स व एम सी व्ही सी कणकवली शाळेचा एच एस सी परीक्षा फेब्रुवारी २०२४ साठी प्रविष्ट विद्यार्थ्यांचा निकाल दरवर्षीप्रमाणे विज्ञान शाखेचा १०० टक्के, वाणिज्य शाखेचा ९५.८३ टक्के तसेच व्होकेशनल विभागाचा ९६.३० टक्के निकाल लागला असून आपल्या शाळेची यशाची परंपरा कायम राखली आहे. शाळेच्या तीनही विभागांमध्ये मिळून परीक्षेसाठी एकूण २०२ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते.
वाणिज्य शाखेमध्ये ७८.१७ टक्के गुण मिळवून डगरे संचाली जयवंत ही तीनही विभागामध्ये सर्व विद्यार्थ्यांत प्रथम आली आहे. तसेच विज्ञान शाखेत झेविअर अॅग्नेल फर्नांडीस हा ७३.५० टक्के मिळवून व्दितीय आला आहे. च प्रशालेच्या विज्ञान शाखेत मालप अमेय अनिल ७०.५० व दळवी आयुष शंकर अनुक्रमे व्दितीय व तृतीय आले आहेत. तसेच प्रशालेच्या वाणिज्य विभागात राणे प्रतिक प्रशांत ७२.६७ टक्के व तारी सौरभ सुनिल ७१.५० टक्के मिळवून अनुक्रमे व्दितीय व तृतिय आले आहेत. शाळेच्या एम सी व्ही सी विभागात शंकर चंद्रकात चव्हाण ६६.३३ टक्के, व सुहानी प्रकाश घाडीगावकर ६६.३३ असे संयुक्त प्रथम व प्रसाद सुनिल घाडी ६५.६७ टक्के, पार्थ सूर्यकांत लाड ६५.५० टक्के असे अनुक्रमे व्दितीय व तृतीय आले आहेत.
वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन कणकवली शिक्षण संस्था कणकवलीचे चेअरमन मा. डॉ. एस. एन. तायशेटे साहेब, सचिव मा. श्री डी. एम. नलावडे साहेब, उपकार्याध्यक्ष मा. श्री एम.ए. काणेकर साहेब, प्रशालेचे प्रभारी प्राचार्य श्री जी.एन.बोडके सर व इतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारीवृंद यांनी केले आहे. व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.












