आचरा (प्रतिनिधी) : चिंदर गावठणवाडी मठ येथील सुरेंद्र उर्फ बाबू परब यांच्या घरी कोब्रा जातीचा साप आल्याची खबर चिंदर बाजार येथील सुप्रसिद्ध सर्पमित्र राजू पडवळ यांना समजताच तात्काळ धाव घेत. कोब्रा मादी जातीच्या 3 फूट लांब सापाला पकडून कुडोपी राई येथील नैसर्गिक अधिवासात मुक्त केले. राजू पडवळ हे मालवण आगारात चालक म्हणून कार्यरत असून सर्पमित्र म्हणून ते समाज सेवा करीत असतात.












