बिळवस हायस्कुलचा निकाल १०० टक्के !

मसुरे (प्रतिनिधी) : माध्यमिक विद्यालय बिळवसचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे. प्रथम क्रमांक कुमारी. संजना प्रदिप हळवे (८५.२०%), द्वितीय क्रमांक वैभवी विलास गावडे( ८२.६०%), तृतीय क्रमांक साक्षी संतोष पालव (८९.४०%) यांनी यश प्राप्त केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष सुर्यकांत पालव, सरचिटणीस अशोक पालव, मुख्याध्यापक जयवंत ठाकूर तसेच सर्व संस्था पदाधिकारी, सर्व शाळा समिती सदस्य, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांच्याकडून अभिनंदन होत आहे.

error: Content is protected !!