स्वराली गायकवाड प्रथम, प्रथमेश पुजारे द्वितीय तर हर्ष घाडीगांवकर तृतीय
सलग पाचव्या वर्षी 100% निकालाची परंपरा कायम
आचरा (विवेक परब) : जनता विद्या मंदिर त्रिंबक हायस्कुलचा इयत्ता दहावीचा निकाल सलग पाचव्या वर्षी 100% लागला आहे. मार्च 2024 रोजी झालेल्या परीक्षेत एकूण 31 विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्या पैकी सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून कुमारी स्वराली एकनाथ गायकवाड ही 457 गुण 91.40% मिळवून प्रथम, कु. प्रथमेश राजेंद्र पुजारी 448 गुण 89. 60% मिळवून द्वितीय, कु. हर्ष प्रवीण घाडीगावकर 434 गुण 86.80% मिळून तृतीय, कु. आर्यन उमेश घाडीगावकर 420 गुण 84%मिळवून चतुर्थ, तर कु. हार्दिक आनंद परब 417 गुण 83.40% मिळवून पाचवा आला आहे सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष सुरेंद्र(अन्ना) सकपाळ, उपाध्यक्ष अशोक बागवे, कार्यवाह अरविंद घाडी त्याचप्रमाणे सर्व माध्यमिक शिक्षक कार्यकारीणी तसेच मुख्याध्यापक प्रवीण घाडीगावकर व सर्व कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केले आहे.












