न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाटची उज्वल यशाची परंपरा कायम

एस.एस.सी. परीक्षेचा १०० टक्के, निकाल

फोंडाघाट (प्रतिनिधी) : मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या एस.एस.सी परीक्षेत न्यू इंग्लिश स्कूल, फोंडाघाटच्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश मिळवत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. या परीक्षेत प्रशालेच्या प्रविष्ठ झालेल्या ९५ विद्यार्थ्यांपैकी ९५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. प्रशालेचा निकाल १०० टक्के लागला असून यामध्ये विशेष श्रेणीत ७६ विद्यार्थी, प्रथम श्रेणीत १७ विद्यार्थी, व्दितिय श्रेणी ०२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. प्रशालेने यावर्षी सुध्दा उज्वल निकालाची परंपरा कायम राखली आहे. ९० टक्केच्या वर १९ विद्यार्थी आहेत. आमच्या प्रशालेचा निकाल पुढील प्रमाणे आहे.

प्रथम तीन विद्यार्थ्यांची नावे प्रथम क्रमांक कु.गायत्री विजयकुमार राठोड 99.20 टक्के, द्वितीय क्रमांक कु.  मानसी राजन नानचे98.60 टक्के, तृतीय क्रमांक कु. चिन्मयी राजन चिके 98.20 टक्के.

यशस्वी विद्यार्थ्याचे फोंडाघाट एज्यू,सोसायटीचे चेअरमन सु.मा. सावंत, सेक्रेटरी चं.शा. लिंग्रस, खजिनदार आ.मा. मर्ये व शाळा समिती चेअरमन द.दि. पवार, तसेच संचालक मंडळ, पालक व ग्रामस्थ तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक  विजय रासम, पर्यवेक्षक प्रसाद पारकर व सर्व शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

error: Content is protected !!