देवदत्त धनंजय गावडे प्रशालेत प्रथम क्रमांक मिळविला

ओरोस (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील कट्टा येथील वराडकर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला आहे. परीक्षेला बसलेले सर्व ७५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून देवदत्त धनंजय गावडे या विद्यार्थ्याने ९८.४० गुण मिळवत प्रशालेत प्रथम क्रमांक मिळविला आहे. द्वितीय क्रमांक सुजल सीताराम परब आणि आत्माराम गुरुप्रकाश म्हाडगुत यांनी ९७.४० टक्के गुण मिळवत संयुक्त मिळविला आहे. तृतीय क्रमांक रिया विशेष भगत हिने ९६.४० टक्के गुण मिळवीत पटकाविला आहे. विशेष श्रेणी ४० विद्यार्थ्यांनी, प्रथम श्रेणी २९ विद्यार्थ्यांनी, द्वितीय श्रेणी ५ विद्यार्थ्यांनी तर एक विद्यार्थी उत्तीर्ण झाला आहे.

या सर्व यशस्वी विद्यार्थी वर्गाचे कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त कर्नल शिवानंद वराडकर (निवृत्त), अँड. एस.एस.पवार, अध्यक्ष अजयराज वराडकर, उपाध्यक्ष आनंद वराडकर, शेखर पेणकर, सचिव सुनील नाईक, विजयश्री देसाई, सहसचिव साबाजी गावडे, खजिनदार रविंद्रनाथ पावसकर व इतर संचालक, शालेय समिती अध्यक्ष सुधीर वराडकर, मुख्याध्यापक संजय नाईक व सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

error: Content is protected !!