माध्यमिक विद्यालय लोरे चे एस. एस. सी. परीक्षेत उज्ज्वल यश

सलोनी रावराणे ८९.२० % गुण मिळवत विद्यालयात पहिली

वैभववाडी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या वतीने मार्च २०२४ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या माध्यमिक प्रमाणपत्र ( इ.१० वी) बोर्ड परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. वैभववाडी तालुक्यातील माध्यमिक विद्यालय लोरे नं-०२ चे २७ विद्यार्थी एस.एस.सी. मार्च २०२४ परीक्षेस प्रविष्ठ झाले होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होत शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे.

प्रशालेची विद्यार्थीनी कु.सलोनी दिपक रावराणे हिने ८९.२० % गुण मिळवत प्रशालेत प्रथम क्रमांक तर कु. भुमिका दिगंबर पानकर हिने ८४.८० % गुण मिळवत प्रशालेत द्वितीय येण्याचा मान मिळविला आहे. तर कु.कुणाल जयदास नाचणेकर याने ८२.८०% गुण मिळवत प्रशालेत तृतीय क्रमांक पटकावला आहे.

प्रशालेतील विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या उज्ज्वल यशाबद्दल व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या विद्यालयातील शिक्षकांचे प्रशालेचे स्थानिक कमिटी अध्यक्ष तसेच संस्था पदाधिकारी यांनी अभिनंदन केले व विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

error: Content is protected !!