कणकवली (प्रतिनिधी) : विद्यामंदिर हरकुळ खुर्द हायस्कूल चा दहावी परिक्षेचा निकाल 100 टक्के लागला असून प्रशालेमध्ये एकुन 13 विद्यार्थी प्रविष्ठ झाले हाेते.त्यातील 5 विद्यार्थी विशेष प्रविण्यासह पास झाले. व 8 विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये पास झाले.यात पहिल्या तीन क्रमांकाध्ये प्रथम कु.प्राजक्त आत्माराम तेली 90 टक्के गुण,द्वितीय कु.सेजल सुहास रासम 87.40 टक्के,तृतीय सानिया सुर्यकांत चव्हाण 83 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाल्या आहेत.
यशस्वी सर्व विद्यार्थांचे मुंबई संस्था अध्यक्ष, जन. सचिव, व पदाधिकारी तसेच शालेय समिती अध्यक्ष, सभासद तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.










