सलग ६ वर्षे १०० % निकालाची परंपरा कायम ठेवली
खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील शेर्पे या गावातील माध्यमिक विद्यालय शेर्पे या हायस्कूलचा मार्च २०२४ एस एस सी बोर्ड परीक्षेचा निकाल १०० % लागला असून शाळेचा विद्यार्थी ओंकार संजय राऊत याने ८५.४० % गुण मिळवून हायस्कूल मध्ये प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. व कु.आदिती ज्ञानदेव राऊत हिने ८३.३० % गुण मिळवून द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे.तर राजेश चंद्रकांत गोसावी याने ८०.४० % गुण मिळवीत तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे परिसरात कौतुक व अभिनंदन केले जात आहे.
शेर्पे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ शेर्पे ता.कणकवली संचलित माध्यमिक विद्यालय शेर्पे या हायस्कूलने सलग ६ वर्षे आपल्या १०० % निकालाची परंपरा कायम राखली आहे. त्याबद्दल शेर्पे शिक्षण संस्था अध्यक्ष व संचालक मंडळ सदस्य तसेच शाळेचे मुख्याद्यापक व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक वर्ग आणि ग्रमस्थ यांचे कडून १० वी बोर्ड परीक्षेत सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन केले आहे.










