असलदे गौरी मंगल कार्यालयात हिंदू मुस्लिम समाज शांतता कमिटीची बैठक संपन्न
कणकवली (प्रतिनिधी) : आपल्या देशात महिला सुरक्षित राहण्यासाठी शासनाचे कडक कायदे आहेत जर एखाद्या महिलेने आपल्या सुरक्षिततेसाठी फिर्याद नोंदवल्यास त्यावर कारवाई करणे हे पोलिसांचे काम आहे त्यामुळे आरोपी जर पीडित महिलेला त्रास देण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यावर कारवाई केली जाईल दोन्ही समाजातील प्रमुखांनी मांडलेला भूमिकेवरून या ठिकाणी एकोप्याने राहणारी माणसे आहेत. असे चित्र आहे कुठल्याही गुन्ह्यातील आरोपी हा आरोपीच असतो तो कुठल्याही जाती-धर्माचा नसतो असे मत अप्पर पोलिस अधीक्षक ऋषिकेश रावले यांनी व्यक्त केले
कणकवली तालुक्यातील असलदे येथील गौरी मंगल कार्यालय येथे हिंदू व मुस्लिम धर्मातील शांतता कमिटीचे बैठक अप्पर पोलिस अधीक्षक ऋषिकेश रावले यांच्या उपस्थितीत पार पाडली याचवेळी कणकवली उपविभागीय पोलीस अधिकारी घनश्याम आढाव, पोलीस निरीक्षक समशेर तडवी, पोलीस किरण मेथे, चंद्रकांत झोरे, मंगेश बावदाने आदी या बैठकीला उपस्थित होते असलदे सरपंच चंद्रकांत डामरे,उपसरपंच सचिन परब,नांदगाव सरपंच रविराज मोरजकर, उपसरपंच इरफान साठविलकर असलदे सोसायटी चेअरमन भगवान लोके , कोळशी सरपंच गुरुनाथ आचरेकर, तोंडवली बावशी सरपंच मनाली गुरव, असलदे माजी सरपंच पंढरी वांगणकर, व्हाईस चेअरमन अतुल सदडेकर, दयानंद हडकर, दिलीप फोंडके, दाजी सदडेकर सुभाष बिड्ये, संजय पाताडे, प्रदीप हरमळकर तात्या निकम, हेमंत कांडर, पप्पी साबळे, निलेश तळेकर, नांदगाव तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष राजू तांबे, नामदेव वाडकर, देवेंद्र हडकर, रघुनाथ लोके, मुस्लिम समाज अध्यक्ष अहमद बटवाले (पटेल), दर्गा समिती अध्यक्ष शकील बटवाले, रजाक बटवाले, उमर नावलेकर, शहाबुद्दीन साठविलकर, माजी सैनिक गवस साठविलकर, अलाउद्दीन बोबडे, जाफर कुणकेरकर आदीसह नांदगाव दशक कृषीतील हिंदू बांधव व नांदगाव येथील मुस्लिम बांधव उपस्थित होते.
यावेळी अपर पोलीस अधीक्षक कृषीकेश रावले म्हणाले स्त्रियांसाठी सुरक्षा महत्त्वाची आहे आम्ही खाकी वर्दी घातली की नागरिकांना सुरक्षा देणे हे आमचे कर्तव्य आहे तो हक्क कोणीही काढू शकत नाही या परिसरात घडलेल्या प्रकाराबाबत समाजातील दोन्ही घटकांनी जागृत होण्याची गरज आहे आपल्या मुलावर पालकांनी लक्ष ठेवले पाहिजे मुलांना सांगा काय बरोबर आहे? काय चूक आहे? या गोष्टी त्यांना पटवून देण्यासाठी प्रयत्न करा महिलांसाठी सुरक्षा महत्त्वाची आहे आरोपीला जात धर्म नसतो त्या त्यामुळे जी कारवाई आहे ते कारवाई केली जाईल त्याला कुठल्याही समाजातील घटकांनी पाठीशी घालू नये अशा सूचना केल्या कुणालाही तक्रार करावयाची असल्यास आमच्या कार्यालयाचे दरवाजे आपल्यासाठी केव्हाही खुले आहेत आपण आम्हाला कळवल्यास दखल घेतली जाईल असा विश्वास त्यांनी दिला
पोलीस निरीक्षक समशेर तडवी म्हणाले दोन्ही समाजातील पदाधिकारी नागरिकांनी आपली मते व्यक्त केली आहेत दोन्ही समाजाने कुठल्याही गोष्टीत जातीय तेढ निर्माण होणार नाही असे सांगितले त्यामुळे आम्ही हिंदू मुस्लिम एकोप्याने राहतील गुन्हेगारावर कारवाई होईल त्याबद्दल कोणीही मनात शंका ठेवू नये कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आपल्यावर आहे दोन्ही समाजातील शांतता बैठक शंभर टक्के यशस्वी झाली आहे असे त्यांनी सांगितले
या बैठकीत अप्पर पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले, कणकवली विभागीय पोलीस अधिकारी घनश्याम आढाव, पोलीस निरीक्षक समशेर तडवी यांचा पुष्पगुच्छ देऊन दोन्ही समाजातील प्रमुखांकडून सत्कार करण्यात आला यावेळी दोन्ही समाजातील प्रमुखांनी शांतता प्रमुखाच्या बैठकीत आपल्या आपापले मुद्दे मांडले त्यानंतर जे झाले जे झालेले प्रकार आहेत त्याबाबत दोन्ही समाजाची कमिटी गठीत करून त्यावर चर्चा करून संवादाने मार्ग काढण्यात येतील असे ठरवण्यात आले










