कणकवली तालुक्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट

भाजपाने कारवाई साठी दिले निवेदन

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यात मागील काही महिन्यांपासून अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला असून पोलिसांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप भाजपा शिष्टमंडळाने केला. तालुक्यातील अवैध धंद्यांवर कारवाई न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा लेखी निवेदनातून देण्यात आला. भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गोट्या सावंत यांच्या उपस्थितीत भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांच्या नेतृत्वाखाली भाजपा शिष्टमंडळाने पोलीस निरीक्षक तडवी यांची भेट घेतली. यावेळी कलमठ उपसरपंच स्वप्नील चिंदरकर, सागर पवार, सुभाष मालंडकर, समीर प्रभुगावकर, विजय चिंदरकर, सिद्धेश तळगावकर, मिलिंद चिंदरकर, पपु पूजरे, वागदे सरपंच संदीप सावंत, बाबू घाडीगांवकर, संदीप सावंत आदी उपस्थित होते. तालुक्यात मागील काही महिन्यांत अवैध दारू सहज उपलब्ध होत आहे. गांजा व तत्सम अंमली पदार्थांची खरेदीविक्री होत आहे.केवळ आकडेवारी पुरती पोलिसांकडून कारवाई दाखवली जाते.यामुळे तरुण वर्ग वाममार्गाला लागत आहे. मटका आणि ऑनलाईन लॉटरी चाही धंदा राजरोसजोमात सुरू आहे. मात्र पोलीस यंत्रणा याकडे दुर्लक्ष करत आहे.

error: Content is protected !!