आमदार पी एन पाटील यांच्या आठवणींना उजाळा देत ‘गड आला पण सिंह गेला’

श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी व्यक्त केली भावना

काेल्हापुर (रोहन भिऊंगडे) : कोल्हापूरच्या जनतेने आपल्याला विश्वासानं दिल्लीत पाठवलं, याचा मला आनंद आहे. निवडणुकीत प्रचारावेळी अनेकांनी टीका केली. मात्र, जनतेला खरं माहीत होतं. या सर्वांंचं श्रेय कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेला आहे, अशा भावना श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी व्यक्त केली. ते आपल्या विजयानंतर माध्यमांशी बोलत होते. यावेळी स्वर्गीय आमदार पी एन पाटील यांच्या आठवणींना उजाळा देत ‘गड आला पण सिंह गेला’ अशी भावना त्यांनी व्यक्त केली. देशात इंडिया आघाडीला चांगला प्रतिसाद मिळाला किमान एकाधिकारशाहीला ब्रेक तरी लागेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

error: Content is protected !!