दिलीप वर्णे यांचे निधन

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील विद्यानगर येथील रहिवासी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित दादा पवार गटाचे प्रांतिक सदस्य दिलीप सुधाकर वर्णे (60) यांचे आज दुपारी अल्पशा आजाराने उपचार सुरू असताना गोवा बांबूळी येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. गेले काही दिवस ते आजारी होते. कणकवलीत खाजगी रुग्णालयात उपचार केल्यानंतर अधिक उपचारासाठी त्यांना बांबूळी येथे दाखल करण्यात आले होते.

error: Content is protected !!