ध्येयाचा पाठलाग करून जीवनात यशस्वी व्हा – डॉ. कुबेर मिठारी

चौके पंचक्रोशी ज्येष्ठ नागरिक सेवा संघ यांच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

चौके (प्रतिनिधी) : चौके पंचक्रोशी ज्येष्ठ नागरिक सेवा संघ यांच्यावतीने प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही दहावी शालांत परीक्षेत चौके येथील भ.ता चव्हाण, म.मा.विद्यालय चौके,या प्रशालेचा निकाल शंभर टक्के लागला असून शाळेत प्रथम तीन क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून चौके प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कुबेर मिठारी उपस्थित होते.यावेळी जेष्ठ नागरिक सेवा संघाचे अध्यक्ष अंकुश पोफळे, कार्याध्यक्ष सदाशिव गावडे, सचिव यशवंत चव्हाण, कार्यकारणी सदस्य बुधाजी चौकेकर,मधुकर चौकेकर,अशोक शृंगारे,रमाकांत देसाई,विजय मासीये,श्रीमती जयश्री परब यांच्यासह या गुणवंत विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते. यावेळी चौके हायस्कूल मधून दहावीच्या परीक्षेत प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या कु.उन्नती कृष्णा परब, द्वितीय क्रमांक कुमारी भार्गवी रमेश पाटकर, कु.जय विश्वनाथ चव्हाण, तृतीय क्रमांक कु. ओंकार विजय चव्हाण यांना रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले,प्रमुख मार्गदर्शक डॉ.कुबेर मिठारी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की दहावी ही यशाची पहिली पायरी असून यापुढेही अजून कठीण परीक्षा देऊन यश संपादन करावे लागणार आहे यासाठी पुढील अभ्यासक्रमासाठी मोठी मेहनत करून ध्येयाचा पाठलाग करावा लागणार आहे. तेव्हाच तुम्ही तुमच्या जीवनात यशस्वी व्हाल. याप्रसंगी कार्याध्यक्ष सदाशिव गावडे,अध्यक्ष अंकुश पोफळे, सचिव यशवंत चव्हाण यांनीही मुलांना मार्गदर्शन केले.यावेळी या गुणवंत विद्यार्थ्यांचे पालक विजय चव्हाण,विश्वनाथ चव्हाण, वृंदा चव्हाण,रमेश पाटकर, कल्याणी परब आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!