केअर समाज सेवा प्रशिक्षण वर्ग सायन येथे जुलै-२४ पासून होईल सुरू

केअर (CARE) गेली २५ वर्षे समाज सेवा प्रशिक्षण संयोजन करणारी संस्था

खारेपाटण (प्रतिनिधी) : कमिटेड अँक्शन फाँर रिलीफ अँण्ड एज्युकेशन संस्थे मार्फत सहा महिन्यांचा समाज सेवा प्रशिक्षण वर्ग (नवीन आँफलाईन बँच) दि.१ जुलै,२०२४ पासून सायन (माहिम व सायन च्या मधे) सुरू होत आहे.दर रविवारी सकाळी १० ते ४ वाजेपर्यंत एकूण चार महिने (जुलै ते आँक्टोबर दरम्यान ) ही बँच संपन्न होणार आहे.

समाज सेवा प्रशिक्षणात समाजसेवेशी निगडित समाजातील वंचितांचे प्रश्न व त्यावरील उपाययोजना ,व्यक्ती – समूह व सामुदायिक कार्य, भारतीय संविधान मुलभूत अधिकार -कर्तव्ये,पोलीस कायदे , समाजसेवी संस्थाची सोसायटी व ट्रस्ट म्हणून नोंदणी प्रक्रीया,समुपदेशन इ. अनेक विषयांवर मार्गदर्शन केले जाईल.
समाजसेवा प्रशिक्षण अभ्यासक्रमात विविध विषयांवरील व्याख्याने, प्रात्यक्षिक ,क्षेत्रकार्य (फिल्डवर्क),लघु प्रबंध,वैयक्तिक व गट सादरीकरण व रोजनिशी या द्वारे समाजसेवा विषयावर सहभागींना प्रशिक्षित करण्यात येणार आहे.केअर संस्थेच्या समाज सेवा प्रशिक्षण वर्गाची ही ५६ वी बँच आहे.या प्राशिक्षण वर्गात युवक युवती, गृहिणी, महाविद्यालयीन विद्यार्थी, सेवा निवृत्त व्यक्ती तसेच नोकरदार वर्ग यांपैकी कोणाही इच्छुक व्यक्तीस सहभागी होता येईल.

समाजसेवा क्षेत्रात उत्तम करिअरची सुरूवात करण्यासाठी तुमच्या संपर्कातील किंवा तुमच्या परिसरातील इच्छुक ,गरजू व पात्र उमेद्वारांची फी देखील आपण प्रायोजित करू शकता. याकरिता अभ्यासक्रम शुल्क रू.२५००/- रुपये असून समाजसेवा प्रशिक्षण वर्गसबंधी अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी पुढील नंबरवर संपर्क करा.रामचंद्र अडसुळेः +91 99670 00081,आनंद राजूः+91 73034 19704,भास्कर काकडः +91 93249 29264

error: Content is protected !!