तिर्लोट-मोहुळ येथील शाळेत मुलांचे औक्षण करुन करण्यात आले स्वागत
देवगड (प्रतिनिधी) : महिना भराच्या विश्रांती नंतर शाळा पुन्हा एकदा मुलांच्या किलबिलटाने गजबजली….. चिमुकल्याच्या स्वागतासाठी आतुरतेने वाट पाहणारी शाळा आज मुलांच्या आगमनाने आनंदीत झाली… तिर्लोट मोहळ सारख्या ग्रामीण भागातील शाळेचीही घंटा आज झाली. शाळा मुलांच्या किलबिलटाने आज पुन्हा एकदा बहरली …. मुलांचे औक्षण करून त्यांचे आयुष्याच्या या आनंद नगरीत स्वागत करण्यात आले…. मान्यवरांच्या हस्ते फुगे व पुष्प देऊन मुलांचे शाळेत स्वागत करण्यात आले…. पहिल्याच दिवशी सवंगड्यांना भेटण्याची ओढ.. नवीन पुस्तके, आणि शालेय साहित्य मिळाल्याने चेहऱ्यावर पसरलेला आनंद… तर काहींना असलेली शाळेची भीती, आई पासून दूर जायचे म्हणून कोसळलेले रडू अशा समिश्र वातावरणात शाळेची पहिली घंटा झाली.. शाळेच्या पहिल्याच दिवशी मुलांना पुस्तके मान्यवराच्या हस्ते वाटप करण्यात आले… तर पहिलीत दाखल मुलांचे व त्यांच्या पालकांचे स्वागत करण्यात आले. विदयार्थ्यांच्या आयुष्याचा पाया ज्या शाळेत घातला जातो ती शाळा आज अंतरबाह्य नटली होती सजली होती….. शाळेत नवीनच हजर झालेले शिक्षक बालाजी देवकत्ते यांचेही स्वागत करण्यात आले … शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नितीन जाधव, उपाध्यक्ष आरती बाईत तिर्लोट ग्रा. प. सदस्या सानवी तिर्लोटकर, प्रताप तिर्लोटकर, सचिन सावंत तसेच शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, पालक उपस्थित होते…. शाळेचे मुख्याध्यापक रविंद्र माने यांनी सूत्रसंचालन केले.












