माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेत विद्यार्थांना पाठ्य पुस्तकांचे वितरण

कणकवली (प्रतिनिधी) : माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेत नविन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थांचे भव्य दिव्य स्वागत करून नव्या शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ झाला. याचवेळी इयत्ता पाचवी ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शासनामार्फत देण्यात आलेली मोफत पाठ्य पुस्तकांचे वाटप मुख्याध्यापक तथा प्राचार्य सुमंत दळवी, पर्यवेक्षक बयाजी बुराण, शालेय समिती खजिनदार गणपत सावंत गुरुजी, शालेय समिती सदस्य बावतीस घोन्सालवीस, व प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या हस्ते करण्यात आले. पहिल्याच दिवशी पुस्तकांचे वितरण केल्यामुळे विद्यार्थ्याच्या शिक्षणात अभिरूची वाढण्यास मदत होईल तसेच आनंददायी अध्ययन होईल शाळेची आवड निर्माण होण्यास प्रोत्साहन मिळेल. या सर्व कारणांचा विचार करून प्रशालेतील ग्रंथालय विभागाचे प्रमुख ग्रंथपाल श्रीम.प्रभू यांनी इयत्तावार पुस्तकांची रचना करून प्रत्येक विद्यार्थ्याला पाठ्यपुस्तक सुलभरितीने वितरित कसे करता येईल याचे सुयोग्य व्यवस्थापन करून ठेवले होते.त्यानुसार शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठ्य पुस्तकांचे वितरण समारंभ पुर्वक शिक्षक व पालकांच्या हस्ते करण्यात आले.यामुळे विद्यार्थ्यांचे शाळेच्या पहिल्याच दिवशी आनंद द्विगुणित होण्यास व अभ्यासाचे चैतन्य निर्माण होण्यात मदत झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!