माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेचा माजी विद्यार्थी स्नेह मेळावा

कणकवली (प्रतिनिधी) : कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी, मोहनराव मुरारीराव सावंत ज्युनि. कॉलेज ऑफ आर्ट्स ॲण्ड काॅमर्स कनेडी, तुकाराम शिवराम सावंत ज्युनि.  कॉलेज ऑफ सायन्स कनेडी आणि बालमंदिर कनेडी यांच्या वतीने वार- रविवार, दिनांक-२३ जून २०२४ रोजी, वेळ: सकाळी १० ते सायं.४ वाजता.मुंबई, स्थळ- मराठा मंडळ वा.ब. फडके मार्ग, केळकर कॉलेज जवळ, मुलुंड (पूर्व), येथे साजरा होत आहे.

कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई या संस्थेची स्थापना दिनांक ४ जुलै १९५४ रोजी कनेडी या ठिकाणी करण्यात आली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची सोय उपलब्ध करून देण्यासाठी या शिक्षण संस्थेची स्थापना झाली. आज या शिक्षण संस्थेने जिल्हा व राज्यस्तरावर उत्तुंग झेप घेतली आहे.

आजच्या स्पर्धेच्या युगात प्रशालेचे माजी विद्यार्थी विविध क्षेत्रात यशस्वी कार्यरत आहेत, त्यांना एकत्रित आणण्यासाठी माजी विद्यार्थी व माजी शिक्षक यांचा “स्नेह मेळावा” आयोजित करण्यात येत आहे.

गेल्या ७० वर्षाच्या कालावधीत संस्था स्थापन झाल्यापासून पहिल्यांदाच भव्य दिव्य असा माजी विद्यार्थी स्नेह मेळावा होत असल्याने हा मेळावा माजी विद्यार्थी व माजी शिक्षक यांचा आनंद द्विगुणीत  करणारा ठरणार आहे. या मेळाव्यात सर्व माजी विद्यार्थ्यांना सहभागी व उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे

 भविष्यात शिक्षण संस्थेची उत्तरोत्तर प्रगती साध्य होण्यासाठी माजी विद्यार्थी, माजी शिक्षक, संस्थेचे सर्व पदाधिकारी, शालेय समितीचे सर्व पदाधिकारी,प्रशालेचे सर्व आजी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी या सर्वांच्या उपस्थितीत हा स्नेह मेळावा संपन्न होणार आहे

error: Content is protected !!