अमित सामंत यांच्यावर वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव
कुडाळ (प्रतिनिधी) : सिधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी येथे उपस्थित राहून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.अमित सामत यांना पक्षाने विधानपरिषदेवर घेऊन आमदार करावे व त्यांच्या कार्याचा सन्मान करावा. पक्षनेतृत्व निश्चितच त्यांची दखल घेईल आणि ते आमदार होतील, असा विश्वास यावेळी सर्वपक्षियांनी व्यक्त केला. अनेक मान्यवरांनी यानिमित्ताने एकमेकांना राजकीय चिमटे काढल्याने कार्यक्रमात मधून-मधून हास्याचे कारंजे उडत होते यांच्या
अमित सामत वाढदिवसानिमित्त अभीष्टचितन कार्यक्रम येथील मराठा सभागृहात आज दुपारी आयोजित करण्यात आला होता. व्यासपीठावर आमदार वैभव नाईक, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रसाद रेगे, शिवसेना (ठाकरे गट) जिल्हाप्रमुख संदेश पारकर व संजय पडले जिल्हा बैंक माजी अध्यक्ष पडते. जिल्हा बँका माजी अध्यक्षा आघाडीप्रमुख अर्चना धारे, आपचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर, जिल्हा बैंक संचालक व्हिक्टर डान्टस, मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब, युवासेना जिल्हाध्यक्ष सुशांत नाईक, कुडाळ नगराध्यक्षा अक्षता खटावकर, जिल्हा चिटणीस आणि राष्ट्रवादी वैद्यकीय सेल जिल्हाध्यक्ष रुपेश जाधव, मंदार शिरसाट, भास्कर परब, पुंडलिक दळवी, द्वारकानाथ धुर्य, अभय शिरसाट, किरण शिंदे, राजन नाईक, माजी सभापती राजन जाधव, बाळ कनयाळकर, रामा शिरसाट आदी उपस्थित होते.
वैभव नाईक म्हणाले, गेली २५ वर्षे अमित सामंत हे जिल्हयाच्या राजकारणात व समाजकारणात काम करीत आहेत. जनतेला कायमच मदत करण्याचे काम ते करतात. पक्षात फूट पडून राजकीय सत्तांतर झाले, तरीसुद्धा पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत ते एकनिष्ठ राहिले आमच्या शिवसेनेतील फुटीनंतर सुद्धा त्यांनी आम्हाला अचूक मार्गदर्शन केले. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर सुद्धा आज सामंत यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी संघटना वाढत आहे. त्याचा मोठा मित्रपरिवार आहे. आता इंडिया आघाडीची सत्ता राज्यात येण्याचे वातावरण आहे. त्यात सामंत यांना निश्चितच चांगले पद मिळेल, असा विश्वास नाईक यांनी व्यक्त केला
प्रवीण भोसले म्हणाले, अमित सामंत लढवय्ये आहेत त्यांना विद्यानपरिषदेवर संधी मिळावी, अशी आमची अपेक्षा आहे. सामंत यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो, जशा शब्दांत प्रसाद रेगे यांनी शुभेच्छा दिल्या. अर्चना धारे म्हणाल्या, पडत्या काळात सामंत यांनी जिल्हयात पक्षाची धुरा सांभाळली सत्ता असो वा नसो, पण प्रशासनावर त्यांची चांगली पकड आहे वेळप्रसंगी आपल्याला आधार आणि वित्त्वास एक भाऊच देऊ शकतो तो भाऊ मला अमित सामंत यांच्या रुपाने मिळाला असल्याचे मी मानते
संदेश पारकर म्हणाले, सामंत यांची राजकीय स्वप्ने पूर्ण व्हावीत. ते आदर्श व्यक्तिमत्व आहे. शरद पवार यांचे सच्चे कार्यकर्ते आहेत आपला मित्र मोठा व्हावा. तो आमदार व्हावा, पण वैभव नाईक यांना स्पर्षक न होता, विधानपरिषदेवर जावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. दीपक नाईक म्हणाले, सामंत यांना घराकडून राजकीय वारसा नाही, पण त्यांच्या आजोळकडून राजकीय वारसा मिळाला त्यांनी खुर्चीच्या मागे न लागता अअसेच प्रामाणिक काम करावे खुर्ची त्यांच्यापर्यंत चालत मावी. तुम्ही मोठे झालात, तरी तुम्हाला मिळणारे प्रेम असेच कायम राहो, अशी अपेक्षा व्यक्त केली संजय पडते म्हणाले, सामंत यांना चांगले भविष्य आहे. त्यांच्या हातून अशाच प्रकारची चांगली सेवा होते राहो तसेच पक्षनेतृत्वाने त्यांच्यावर मोठी जबाबदारी देऊन त्यांच्या कामाचा सन्मान करावा. सतीश सावंत म्हणाले, कुडाळातच तुम्ही सर्व एकत्र येतात, पण आमच्या कणकवलीत मात्र हे चित्र दिसत नाही अमित सामंत मोठे व्हावेत आमदार होऊन पालकमंत्री व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली
मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब, आपचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर, शिवसेने (शिंदे गट) चे संजय भोगटे, व्हिक्टर डान्टस, द्वारकानाथ धुर्वे, बाळ कनयाळकर आदींनीही मनोगत व्यक्त करीत सामंत यांच्या राजकीय व सामाजिक कार्याचा गौरव करीत त्यांना शुभेच्छा दिल्या सूत्रसंचालन व आभार शिवाजी घोगळे यांनी मानले.












