कोकणातील शाळांचे शुन्य वीज बील करण्यासाठी प्रयत्न करणार – निरंजन डावखरे

कासार्डे माध्यमिक विद्यालयात प्रचारात दरम्यान दिले अभिवचन

तळेरे (प्रतिनिधी) : सिंधुदुर्गातील शैक्षणिक संस्थेचा एक कार्यकर्ता म्हणून मी जोडला जाईन आणि कोकणातील शाळांचा प्रत्येक प्रश्न शासकीय स्तरावरून सोडविण्यासाठी प्रयत्नशील असेन, प्रत्येक शाळा ग्रीन स्कूल करण्यासाठी तसेच शून्य विज बिल येण्यासाठी सोलर पॅनल योजना राबवण्याची योजना आणली जाईल त्यासाठी मेधा ( MEDHA) च्या योजना यांचा समन्वय करण्यासाठी पुढाकार घेतला जाईल असे आश्वासन कोकण पदवीधर मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार आम. निरंजन डावखरे यांनी कणकवली तालुक्यातील कासार्डे माध्यमिक विद्यालय, कासार्डे येथे केले.

याप्रसंगी व्यासपीठावर जि.प. सदस्य संजय देसाई,प.स.सदस्य तथा कोकण भजन सम्राट प्रकाश पारकर, भाजपा तालुका अध्यक्ष संतोष कानडे, श्री.सावंत,कासार्डे शिक्षण संस्थेचे स्थानिक व्यवसाय समितीचे कार्याध्यक्ष संजय पाताडे,मुख्याध्यापिका बी.बी. बिसुरे व अन्य मान्यवर उपस्थित होते.
प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.बी.बी.बिसुरे यांनी आम. निरंजन डावखरे यांचे स्वागत करून प्रशालेतील भौतिक सुविधांविषयी त्यांना निवेदन सादर केले.दरम्यान याप्रसंगी कासार्डे गावचे उपसरपंच गणेश पाताडे, ग्रा.प.सदस्य अण्णा खाड्ये,अभि धुमाळ व इतर सदस्य,तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.

आम. निरंजन डावखुरे यांनी येत्या 26 जून रोजी एक नंबर पसंतीचे मत देऊन आपल्याला भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन उपस्थित शिक्षकांना केले.
आभार संजय पाताडे यांनी मानले.

error: Content is protected !!