कृषी दूतांनी साजरा केला योग दिन

तिथवली (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील तिथवली येथील श्री स्वामी विवेकानंद हायस्कूलचे मुख्यद्यापक मिलिंद मेस्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली २१ जून हा दिवस जागतिक योग दिन म्हणून कृषी दूतांनी साजरा केला. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी विविध योगासने सादर केली. व योगासने आपल्या सर्वासाठी आरोग्याच्या दृष्टीने किती महत्वाची आहेत याविषयी शिक्षकांनी व कृषी दूतांनी माहिती दिली. तर शाळेचे शिक्षक प्रदिप नाईक व गणेश टकले व कृषी दूत सिद्धेश वारीक,ऋषिकेश भोंग, कौशल पाताडे, ओवेश संसारे,वैभव बंडगर, सुशांत तायडे, शुभम राऊत, अनिकेत मारकड यांनी शालेय विद्यार्थ्यांना योगासनांची प्रात्यक्षिके करून दाखविली. कृषी दूतांनी व शालेय शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी आजच्या योग दिन कार्यक्रमात आनंदाने सहभाग घेतला.

error: Content is protected !!