चौके (प्रतिनिधी) : भ. ता. चव्हाण म मा विद्यालय चौके तालुका मालवण विद्यालयात योग दिन उत्साहामध्ये साजरा करण्यात आला. प्रथमतः प्रशालेचे विज्ञान शिक्षक श्री प्रसाद परुळेकर यांनी सर्व विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व पटवून दिले. शरीर, मन आणि आत्मा त्यांना एकत्र आणणारे साधन म्हणजे योग. आपल्या शारीरिक उन्नतीसाठी तसेच आयुष्य सुंदर करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने अर्धा तास तरी योगाचा सराव करावा असे प्रतिपादन त्यांनी केले. प्रशालेचे संस्था प्रतिनिधी शंकर गावडे सर यांनी सर्व विद्यार्थ्यांकडून योगा तसेच विविध आसनांचा सराव करून घेतला. तसेच प्रत्येक आसनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले.
प्रशालेच्या मुख्याध्यापिका गोसावी मॅडम यांनी प्राणायाम अनुलोम विलोम यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले व सराव करून घेतला. किमया चव्हाण, कुमारी अनुश्री गोसावी, अनुष्का शिंदे या विद्यार्थिनींनी विविध आसने सहजरित्या करून विद्यार्थ्यांकडून सुद्धा सराव करून घेतला. यावेळी क्रीडा शिक्षक अनिल आचरेकर, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यालयातील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.