गुणवंत विद्यार्थी ही समाजाची संपत्ती – घनश्याम गांवकर

कणकवली (प्रतिनिधी) : समाजातील गुणवंत विद्यार्थी हे समाजाची संपत्ती असते आणि त्यांना संपत्तीप्रमाणेच जपायचे असते. असे प्रतिपादन क्षत्रिय मराठा घाडीगांवकर सेवा समाज, मुंबई संस्थेचे राज्य अध्यक्ष घनश्याम गांवकर यांनी केले.

क्षत्रिय मराठा घाडीगांवकर सेवा समाज मुंबई संस्थेच्या सिंधुदुर्ग विभागाच्यावतीने रविवारी कणकवली येथील मातोश्री हॉल येथे घाडीगांवकर समाजातील इयत्ता १०/१२ वी च्या परीक्षेत तसेच स्कॉलरशिप आणि क्रीडा स्पर्धांमध्ये विशेष गुणवत्ता मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला. यावेळी गांवकर बोलत होते . समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी समाजातील धुरीनांनी नेहमीच पुढे यायला हवे .त्यांना योग्य त्या वेळी मार्गदर्शन , मदत आणि सहकार्य समाज घटक म्हणून करायला हवे. एखादी संपत्ती आपण ज्याप्रमाणे जपतो , त्याप्रमाणेच समाजातील या गुणवंत विद्यार्थ्यांना आपण जपायला हवे,असे घनश्याम गांवकर पुढे म्हणाले.

या कार्यक्रमात बोलताना घाडीगांवकर संस्थेचे राज्य कार्यकारणी सदस्य तथा प्रसिद्धी प्रमुख विजय गांवकर यांनी विद्यार्थ्यांना व्यवसाय मार्गदर्शन केले. भविष्यातील क्षितिजे आणि स्वतःचा कल ओळखून, जाणून घेऊन त्या क्षितिजांकडे वाटचाल करायला विद्यार्थ्यांनी शिकले पाहिजे. पुढे येणाऱ्या व्यवसायाच्या नोकरीच्या संधी कोणत्या असतील याची माहिती त्यांनी व्यवसाय मार्गदर्शक तसेच इंटरनेट या माध्यमातून मिळवायला हवी. उद्याचे युग हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचे आहे, हे विद्यार्थ्यांनी आता जाणून घ्यायला हवे. व्यवसाय अथवा शिक्षणक्रम निवडताना अंधानुकरण करू नये असे,ते पुढे म्हणाले .

विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांना भेटवस्तू आणि प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले.या कार्यक्रमास घनश्याम गांवकर,लक्ष्मण घाडीगांवकर ( उपाध्यक्ष) ,विजय गांवकर, सूर्यकांत घाडी (अध्यक्ष-सिंधुदुर्ग विभाग ), विजय घाडी (उपाध्यक्ष ), प्रदीप घाडी (सचिव), बुधाजी घाडीगांवकर (सहसचिव ),सुनील गांवकर (खजिनदार ),सत्यवान घाडीगांवकर, एस. व्ही. घाडीगांवकर, सौ. प्रीतम घाडीगांवकर (सिंधुदुर्ग महिला अध्यक्ष ) अश्विनी गांवकर, भिसाजी घाडी, सदानंद घाडीगांवकर,चंदन घाडी,कळसुलकर गुरुजी,आडेलकर गुरुजी, संभाजी घाडीगांवकर , कृष्णा घाडीगांवकर, सुभाष गांवकर,जगन्नाथ गांवकर, प्रवीण घाडीगांवकर आदी पदाधिकारी आणि समाजबांधव तसेच गुणवंत विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!